Lockdown
आणि, बघता बघता lockdown चा महिना पूर्ण होत आला. वेगाने धावत चालले हे जग, स्पर्धा, स्वपण, ध्येय यांच्या मागे चालले हे जग क्षणभर साठी विश्रांती घेईल असे कधीं स्वप्नातही वाटले नव्हते. पण नेहमी प्रमाणे कधीही न पूर्ण होणाऱ्या स्वप्नांप्रमाणे आज प्रत्यक्ष समोर जे घडत आहेत स्वप्न की कठीण वास्तव? लहानपणापासूनचा मनाचा समज नव्हे तर ठामपणे सांगण्यात आलेलं मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे परिक्षेची तयारी, नवीन आर्थिक वर्षाची तयारी, उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी, आंबे येण्याचे दिवस इत्यादी. परंतु इतक्या वर्षात पहिल्यांदाच हा भ्रमाचा भोपळा फुटला. आणि कळाले निसर्गा समोर, परिस्थिती पुढे मानवाचे काय पण कोणाचेही काही कधीच चालत नसते. विसाव्या शतकात जग खूप जवळ असेल असे ऐकूण होते. परंतु हे जग जवळ आणायला एक विषाणू मदत करेल? असा विचार देखील कोणी कधी केला नसेल.
असो! नव्या उमेदीने २०२० हे वर्ष सुरू झाले. ज्या वर्षा साठी खूप आतुरतेने वाट पाहत होते कारण. नववी तील इंग्रजी पुस्तकातील डॉ. अब्दुल कलाम यांचा धडा Mission 2020 India. भारत देश या वर्षी खूप विकसीत होईल व नवीन काहीतरी बघायला मिळेल या आशेने. पण आज इथे खूप वेगळे जग दिसत आहे.
चीन या देशाची पहिली ओळख झालेली ती शाई च्या Hero Pen या आवडत्या गोष्टीपासून. त्याच्या टोपण वर लिहलेले Made in China हे वाचून वाटायचे अरे वा! आपण बाहेरच्या देशातील इम्पोर्टेड वस्तू वापरतो. भलतेच मनाला अप्रूप वाटायचे. बालमनाला त्या वयात वास्तवतेची जाणीव देखील नसेल. जसे वय वाढत गेले तेव्हा या देशाची ओळख बारीक डोळे असलेल्या गोऱ्या माणसांचा देश, खूप लोकसंख्या असणारा देश, झुरळ, बेडूक, पाली इत्यादी विचित्र प्राणी खाणाऱ्या लोकांचा देश अशी ओळख होत गेली. ज्या प्राण्यांना बघून आमची बोबडीच वळते असे प्राणी ही लोक खातात? हे ऐकुन त्यांच्या विषयी वेगळेच कुतूहल निर्माण होत असे. परंतु आज हा देश, त्यांच्या खाण्याची परंपरा, वृत्ती इत्यादी गोष्टींची चर्चा आज सगळ्या जगात सुरू झाली व नव्याने या देशाची ओळख संपूर्ण जगाला मिळाली. कारण आज जग थांबविण्यासाठी या देशाने दिलेली मोठी देणगी म्हणजे एक सूक्ष्मजीव कोरोना (COVID-19). हो या सूक्ष्मजीवांतच हे जग थांबवण्याची आज ताकद आहे म्हणतात ना कधी ही कोणाला कमी लेखू नये फक्त युद्ध, शस्त्र, मिसाईल इ. पण नव्हे तर एक सूक्ष्मजीव पण हे जग थांबवू शकतो.
लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर, कोथरूड, पुणे-३८
Comments