तुझीच वाट बघणारी...


    आज दीड महिना झाला. तरी तो मला एकदाही भेटायला आला नाही. मी कशी असेल काय करत असेल याची त्याला जरा देखील काळजी नसेल का? तो मला विसरला असेल का? असा अचानक तो का मला इथे ठेवून गेला? अजूनही मला तो दिवस आठवतो. त्या दिवशी पहील्यांचाच त्याने मला एका प्रदर्शन मध्ये पाहिले होते. काहीही न बोलताच एक टक माझ्या कडे बघितले होते. पण नंतर मित्राशी काहीतरी बोलून तो तिथून लगेच निघून गेला. परत आला ते घरच्यांना घेऊन. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वर माझे स्वागत झाले होते. मी पहिल्यांदाच त्याच्या घरी आल्याच्या आनंदात किती पेढे वाटले होते त्याने. रोज सकाळी किती प्रेमानं माझ्याकडे पाहत असे व किती जपायचा तो मला. मला थोडे जरी खरचटले तरी किती दुःख होत होते त्याला. लेह लडाख, गड किल्ले, अशा किती तरी अवघड सफारी त्याने माझ्या बरोबर केलेल्या. थोडा जरी तणाव आला तरी माझ्या बरोबर फिरल्यावर त्याचा लगेच मूड च बदलत असे. त्यादिवशी त्याने मला पार्किंग मध्ये सोडले. व रविवारी आपल्याला महाबळेशवरला जायचे आहे तू तयार रहा असे सांगून तो निघून गेला तो अजुनही आला नाहीये. इतके दिवस त्याची वाट बघून मी पण धुळीने माखली  व मला आता गंज चढत आहे. आता माझे सगळे बळ संपत चालले आहे. तो जिवंत असेल ना अजुनही. त्याचीच  आतुरतेने पार्किंग मध्ये वाट बघणारी...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुझीच पार्किंग मध्ये वाट बघणारी.
(एक गाडी  🏍 - रॉयल एनफिल्ड/ हीरो होंडाा/ अपाचे/ ज्यूपिटर/ पल्सर/ऍक्टिवा)😂🤣😊❣️😍

लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर

Comments

Popular posts from this blog

Dear 2024

Angel

Commitment!!