हरवलेली नाती......

Lockdown  निमित्ताने खूप वर्ष कपाटावर धूळ खात बसलेली फोटो अल्बम ची पिशवी हाती लागली व रिकामी वेळेचा सदुपयोग करून घ्यावा म्हणून एक एक अल्बम नव्हे तर आठवणीचे कप्पे उलगडू लागले. आई बाबांच्या लग्नापासून ते माझ्या दहावी पर्यंतच्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ लागल्या. फोटो मधील त्या सगळ्यांचे हास्य किती निर्मळ होते. त्या काळातील ते फोटो बघताना सगळेच किती आपलेसे व सुखी वाटत होते. आता फोटोग्राफर आलेत नवीन कॅमेरा आले. तरी त्या फोटोची तोड नाहीच. तेव्हा मोबाईल नव्हता, किंवा सुंदर क्षण टिपायला कॅमेरा ही नव्हता. तरी पण त्या आठवणी आपल्या हुबेहूब लक्षात राहतात. व सुखावून जातात. ते क्षण आपण खरोखर जगले होतो. व हल्ली प्रत्येका कडे कॅमेरा असणाऱ्या फोन मुळे आपण क्षण जगण्या पेक्षा ते टिपण्यात च गुंग असतो.  आज आपल्याला आठवडा पूर्वीचा कार्यक्रम नाही आठवणार पण  पंधरा वीस वर्षांपूर्वी ची आठवण, प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो. मोबाईल मधील फोटो बघण्यापेक्षा त्या अल्बम मधील व मनातील फोटो बघताना च आनंद हा अलोकीक च. हा आनंद पुढील पिढीला कधी कदाचित अनुभवता येणार च नाही.
 तेव्हा अभिमानाने आम्ही सगळ्यांना सांगत असू आमचे १०० लोकांचे कुटुंब. तेव्हा सख्खे चुलत हे काय असते हे माहीतच नव्हते. घरात कोणाचाही वाढदिवस , लग्न , पूजा, आली की खूप धमाल यायची.
पण आता ही आपलीशी वाटणारी नाती कुठे हरवली. हककाने जिथे भांडत होतो. तिथे विचारपूस पण करायला का टाळाटाळ होऊ लागली. आज भरलेल्या घरात , माणसांच्या गडबडीत का नकळत एकटे वाटू लागले.  आपले पणाची पण का जास्त भीती वाटू लागली. आपली वाटणारी नाती का दुरावली.  तेव्हा ही रुसवे फुगवे होत च असतील. पण तेव्हा कदाचित रूस्व्या फुग्ण्यापेशा आपली माणसे महत्वाची वाटत असतील. आजकाल कोणी रुसले तर त्याला मायेने समजवायला ही कोणी जात नाही. व हा तात्पुरता रुसवा कायमस्वरूपी नको असणारा अबोला धरतो.आधी रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असली की हमखास घरी कोणीतरी आपले माणूस येणार हे ठरलेलं. त्यांची उठबस करण्यात रविवार मजेत निघून जायचा. पण आज काल हे रविवार देखील ऐकांतात निघून जातात. कदाचित ही परिस्थिती च अशी झाली असेल सगळीकडे चूक नसेल ही कोणाची . आपली माणसे कोणाला नको असतात?  पण काळाबरोबर चालताना आपल्याला आपण कसे बरोबर समोरच्याला आपले तरी कुठे काय चुकले? याच भ्रमात आपण राहतो. डिजिटल युगात माणसे खूप जवळ आली. पण आपली नाती मात्र कुठेतरी हरवली.



Comments

Popular posts from this blog

Happiest Birthday to Aai

Presence

Angel