Posts

Showing posts from November, 2023

जिवलग मैत्रीण

Image
मैत्रीण हा शब्द च किती आपलासा आहे. आपण तिच्या कडे मन मोकळे पणा ने बोलू शकतो,सल्ले ऐकू शकतो,तिच्या सोबत असताना कोणतेही दडपण वाटणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नवीन मैत्रीण भेटत असते. लहानपणी शाळेत सोबत बसणारी मैत्रीण, घरी खेळताना सोबत असणारी मैत्रिण, पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर खूप साऱ्या मैत्रीण च मैत्रिणी, प्रत्येक मैत्रिणी चे त्या त्या टप्यावर वेगळेच महत्व काहीजणी थोड्या काळासाठी तर काहीजणी आयुष्य भराच्या मैत्रिणी. लहानपणी आईला प्रत्येक मैत्रिणी ची ओळख करून दिल्यावर ती होणारी मैत्री आणखी जास्त घट्ट होत असे. फक्त आई ला च कसे काय माहिती असते कोणती फक्त पुढे साथ देणारी मैत्रीण आणि कोणी फक्त गरजेची, ओळखीची. आईचे अंदाज कधीच चुकीचे नसायचे. ज्या मैत्रिणी माझ्या पेक्षा जास्त आईला भेटायला यायच्या त्याच खर तर पुढे माझ्या जवळच्या मैत्रिणी झाल्या. आयुष्यात नाती तर आपण जन्माला यायच्या आधीच असतात. पण मैत्रीचे नाते फक्त आपण स्वत: निवडू शकतो. आपण जिवंत असताना खुप सारी नाती असतात पण आपण नसताना ते नाते निभावणे हे फार कमी लोकांना जमत असते. आईची कोणी मैत्रीण असेल का? असा सारखा प्रश्न पडायचा...