जिवलग मैत्रीण

मैत्रीण हा शब्द च किती आपलासा आहे. आपण तिच्या कडे मन मोकळे पणा ने बोलू शकतो,सल्ले ऐकू शकतो,तिच्या सोबत असताना कोणतेही दडपण वाटणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नवीन मैत्रीण भेटत असते. लहानपणी शाळेत सोबत बसणारी मैत्रीण, घरी खेळताना सोबत असणारी मैत्रिण, पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर खूप साऱ्या मैत्रीण च मैत्रिणी, प्रत्येक मैत्रिणी चे त्या त्या टप्यावर वेगळेच महत्व काहीजणी थोड्या काळासाठी तर काहीजणी आयुष्य भराच्या मैत्रिणी.
लहानपणी आईला प्रत्येक मैत्रिणी ची ओळख करून दिल्यावर ती होणारी मैत्री आणखी जास्त घट्ट होत असे. फक्त आई ला च कसे काय माहिती असते कोणती फक्त पुढे साथ देणारी मैत्रीण आणि कोणी फक्त गरजेची, ओळखीची. आईचे अंदाज कधीच चुकीचे नसायचे. ज्या मैत्रिणी माझ्या पेक्षा जास्त आईला भेटायला यायच्या त्याच खर तर पुढे माझ्या जवळच्या मैत्रिणी झाल्या. आयुष्यात नाती तर आपण जन्माला यायच्या आधीच असतात. पण मैत्रीचे नाते फक्त आपण स्वत: निवडू शकतो. आपण जिवंत असताना खुप सारी नाती असतात पण आपण नसताना ते नाते निभावणे हे फार कमी लोकांना जमत असते.
आईची कोणी मैत्रीण असेल का? असा सारखा प्रश्न पडायचा. ओळखीची लोक तर तिची खूपच होती. पण आईची जिवलग मैत्रीण?
मैत्री ची वरवर माहिती असणारी व्याख्या आईच्या मैत्रीच्या नात्याची ओळख झाल्यावर खूपच फिकी वाटली.
शून्य ते पूर्णत्व मध्ये साथ देणारी आईची मैत्रिण ती म्हणजे बाई काकी.
काकी आणि आई मैत्रिणी कशा झाल्या असतील या बाबत अजूनही प्रश्न च पडतो? काकी मुंबई ची आणि आई गावातील तरी देखील हे दोन टोकं एकत्र आली.
काकी नावाचे कधी दडपण नाही आले कारण,
काकी  तूच आईची सगळ्यात जवळची मैत्रीण होती आणि आहेस. आई आणि तू कसे काय ग मैत्रिणी झाल्या असाल? कदाचित तुमच्या दोघीन कडे असणारा स्वाभिमान या एका स्वभाव मुळे कदाचित तुम्ही दोघी जवळ आल्या. आमच्या शिक्षणा साठी, स्वतःच घर घेण्यासाठी तू आईला प्रोत्साहन दिले. फक्त सुखात जवळ येणाऱ्या लोकांना आम्ही बघितले पण तू शून्यातून आईच्या सोबत होती. जगात कोणाचीच साथ नसेल पण एक व्यक्ती जरी कणखर पणे मागे उभा राहिला तर शून्यात असणाऱ्या व्यक्तीला हत्ती चे  बळ मिळते आणि ते तू केले.
आईला सगळ्या गोष्टी हक्काने सांगायला तू होती आणि तुला ती. तु काका  सोबत पण जेवढे बोलली नसेल तेवढे तुम्ही दोघी बोलत बसायच्या. कोणत्याही कार्यक्रम मध्ये तुम्ही एकमेकिना शिवाय जेव्याचा पण नाही. प्रत्येक चांगल्या, वाईट प्रंसंगा मध्ये तुमची एकमेकींना निस्वार्थी साथ होती. सख्या बहिणी पेक्षा जवळ चे तुमचे नाते होते.
आज ती नाहीये तरी सुद्धा तू हे नाते निभवते.
आज ही दिसते तुला किती तिची कमतरता वाटते. तुला खूप काही तिच्याशी बोलायचे आहे. पण बघ ना देवाला पण तुमच्या मैत्रीची इर्षा वाटली असेल.
आई ला तुझी खूप खात्री होती. ती दीदी ला बोलायची एक वेळ मला फोन नको करू पण काकी ला कर. तिच्याशी बोल. तिला कदाचित माहिती असेल सगळे बदलले तरी तू तिच्या मुलींना कधी एकटे पडू देणार नाही.
जिवंत असेपर्यंत साथ देणारी लोक भेटतील पण ती व्यक्ती नसताना न बदलणे तिच्या सोबत ते नाते शेवट पर्यंत निभावणे हे खूप कमी लोकांना जमते.
तुमच्या दोघी सारखी मैत्री जर सगळ्यांना मिळाली तर खरंच या जगात कोणालाच कधी एकटे एकाकी नाही वाटणार. आम्हाला तुमच्या दोघींची मैत्री बघता आली , अनुभवता आली हेच आमचे मोठे भाग्य आहे.

एक मैत्रीण असावी
मनातले सगळे बोलणारी
सगळे ऐकून घेणारी
आवड जपणारी
पाठीशी उभी राहणारी
प्रसंगी साथ देणारी.
लोकांना इर्षा वाटणारी
शेवट नंतरही नाते निभवणारी.

Comments

Popular posts from this blog

Happiest Birthday to Aai

Presence

Angel